एमएपीपीपी पब्लिक आयईसीसीएचआरपॅन इंडिया आणि पॅन एपी कडून प्रेस रिलीझ : 18.09.2020

अधिक लोक प्रभावित, आरोग्यास अधिक गंभीर नुकसान: भारतातील यवतमाळ जिल्ह्यात सिंजेंटाच्या “पोलो” या किटकानाशमुळे विषबाधा झाल्याच्या घटना पूर्वीपेक्षा बऱ्याच मोठ्या प्रमाणात घडल्या. हे केवळ नोंदणीकृत केलेल्या कागदपत्रांद्वारे दर्शविले गेले आहे, तरीही बासेल येथे स्थित असलेली कृषी-रसायन कंपनी अजूनही अत्यंत विषारी उत्पादन भारतात विकते. याचा परिणाम म्हणून, आज प्रभावित ५१ कुटुंबे स्वीस ओईसीडी नॅशनल कॉन्टॅक्ट पॉईंट वर विशिष्ट उदाहरण दाखल करीत आहेत.

हिवाळी हंगाम २०१७ मध्ये, मध्य भारतातील यवतमाळ प्रदेशातील शेकडो कापूस उत्पादकांना कीटकनाशकांद्वारे तीव्र विषबाधा झाली. पॅन इंडिया आणि पब्लिक आय यांनी दिलेल्या अहवालांमध्ये संदर्भ आणि त्याचे परिणाम यांचे दस्तऐवजीकरण केले गेले. सिंजेंटाने या घटनेच्या आरोग्य व आर्थिक दुष्परिणामांची कोणतीही जबाबदारी स्पष्टपणे नाकारली आणि असा दावा केला की पोलो * विषबाधा प्रकरणात सामील असल्याचा कोणताही “पुरावा नाही”. जगातील सर्वात मोठ्या कीटकनाशकाच्या उत्पादकांनी अगदी स्विस नॅशनल टीव्हीद्वारे तयार केलेल्या आणि प्रसारित केलेल्या यवतमाळच्या माहितीपटांवर अधिकृतपणे आक्षेप घेतला.

आमच्या भागीदार संस्थांकडून प्राप्त अधिकृत कागदपत्रे आता या दुर्घटनेचे आणि त्याच्या चालू असलेल्या घोटाळ्यामध्ये पोलोने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे प्रदर्शन करतात, आणि कागदपत्रांनुसार, पोलिसांनी सिंजेंटाच्या कीटकनाशकाशी संबंधित विषबाधेची ९६ प्रकरणे नोंदविली, त्यापैकी दोन मृत्यूमुखी पडले. या तथ्यांच्या आणि पुढील संशोधनाच्या आधारे, लोकल महाराष्ट्र असोशिएशन ऑफ पेस्टीसाईड पॉइझनड परसन्स (एमएपीपीपी) ने पेस्टिसाइड नेटवर्क इंडिया (पॅन इंडिया) आणि एशिया पॅसिफिक (पॅन एपी), युरोपियन कॉन्स्टिट्यूशनल अँड ह्युमन राईट्स (ईसीसीआरआर) आणि पब्लिक आय यांनी एकत्रितपणे ५१ शेतकरी कुटुंबांचे दस्ताऐवजीकरण केले.

पोलो फवारणीनंतर त्यांच्यात गंभीर लक्षणे दिसले असा विषबाधा पासून वाचलेल्यांचा अहवाल आहे. ५१ बळी पडलेल्यांपैकी ४४, त्यापैकी बहुतेक जाणंना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांना तात्पुरते अंधत्व आले आणि १६ लोक अनेक दिवस बेशुद्ध होते. मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होण्यापासून ते मज्जातंतू विकार आणि स्नायूंच्या तक्रारीं पर्यंतची इतर लक्षणे आहेत, त्यातील काही लक्षणे आजही चालू आहेत. परिणामी, लोक बऱ्याचदा काम करण्यास तात्पुरते असमर्थ होत होते, ज्यामुळे त्यांचे आधीच कमी असलेले उत्पन्न कमालीचे कमी झाले.

हे प्रकरण मानवी हक्कांच्या उल्लंघनांचे गंभीर उदाहरण आहे, याबाबत स्विस कंपन्या कारणीभूत ठरू शकतात आणि आता जबाबदारी स्वीकारावी की नाही याबाबत कंपन्या निवडू शकतात. जबाबदार व्यवसाय पुढाकार संस्था त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि अशा घटना रोखण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल आहे. शेवटी परिश्रमपूर्वक प्रयत्नांची आवश्यकता सक्ती करते कि सिंजेंटाला त्याच्या उत्पादनांशी संबंधित असंख्य जोखीम गंभीरपणे घेण्यास भाग पाडले जाईल आणि आणखी एक यवतमाळ होणार नाही याची हमी दिली जाईल.

पीडित कुटुंबांच्या मदतीसाठी एमएपीपीपी, पॅन इंडिया, पॅन एपी, ईसीसीएचआर आणि पब्लिक आय यांनी बहुराष्ट्रीय उद्योगांवर ओईसीडी मार्गदर्शक तत्त्वांसाठी नॅशनल कॉन्टॅक्ट पॉंईट (एनसीपी) कडे एक विशिष्ट उदाहरण दाखल केले आहे. एकत्रितपणे ते अशी मागणी करीत आहेत की, सिंजेंटाने भारतातील अल्प भूधारक शेतक-यांना धोकादायक कीटकनाशके विकण्यास टाळावे ज्यांना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई)ची आवश्यकता आहे आणि ज्यासाठी – ज्याप्रमाणे पोलोच्या वापरामुळे- विषबाधा झाल्यास कोणताही उतारा उपलब्ध नाही. याव्यतिरिक्त, कंपनीने ५१ पीडित कुटुंबांना उपचार खर्च आणि उत्पन्न गमावण्यासाठी भरपाई द्यावी.

पोलिस कागदपत्रांमध्ये पोलो मूळे दोन मृत्यू झाल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. हयात नातेवाईक आणि विषबाधा प्रकरणातील तिसरा वाचलेला एक व्यक्ती आणि बासेलमधील एक विशेषज्ञकायदा कंपनीने ने एकत्र येऊन उत्पादनांच्या दायित्वावर आधारित भरपाईसाठी दावा केला आहे, कि कीटकनाशकामध्ये सक्रिय घटकांपैकी एक (डायफेन्थुरान) थेट स्वित्झर्लंडहून आला आहे. बासेल शहरातील कॅन्टोनच्या दिवाणी न्यायालयात (लवाद अधिकार) वकील श्री सिल्व्हिओ रीसेन, श्री थाबाउट मेयर, लॉफर्म स्केडेनान्वल्टे यांनी हा खटला भरलेला आहे. हे कायदेशीर पाऊल ओईसीडी (एनसीपी) स्पेशल इन्स्टन्स शी समांतर परंतु स्वतंत्रपणे घेतले जात आहे, ज्यामध्ये या दोन पक्षांचा सहभाग नाही.

कंपनीच्या परदेशी सहाय्यक कंपन्यांनी केलेल्या मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास कंपनीचे मुख्यालयदेखील जबाबदार असण्याची हमी जबाबदार व्यवसाय पुढाकार संस्था देईल. जर स्विस मुख्यालयाने काळजी घेण्यासाठी पुरेसे कर्तव्य केले असते तर हा भंग रोखला गेला असता.
विशेषत: भारतात ही पहिलीच वेळ आहे जिथे कीटकनाशक विषबाधा बळी या टप्प्यावर पोहोचले आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्कः
देवानंद पवार, संयोजक, एमएपीपीपी, +९१ ९४२३१३१९५९
डॉ. नरसिम्हा रेड्डी, पॅन इंडिया, + ९१ ९०१०२०५७४२ , nreddy.donthi20@gmail.com
ऑलिव्हर क्लासन, मीडिया संचालक पब्लिक आय, +४१४४२७७७९०६, oliver.classen@publiceye.ch
एनाबेल बर्मेजो, ईसीसीएचआर मीडिया संचालक, +४९३०६९८१९७९७, presse@ecchr.eu

*पोलो हे ‘डायफेन्थुरान’ या सक्रिय घटकासह कीटकनाशक आहे जे २००९ मध्ये स्वित्झर्लंडमधील बाजारपेठेतून काढून घेण्यात आले आहे, याची नोंद पीआयसीच्या अधीन असलेल्या रसायनाच्या यादीमध्ये आहे, ज्याचा अर्थ असा आहे की सक्रिय घटक जो पर्यावरण आणि मानवी आरोग्याचे रक्षण करण्यासाठी प्रतिबंधित केला आहे. युरोपियन केमिकल्स एजन्सी (ईसीएचए) ने डायफेन्थुरान ला “श्वास घेताना विषारी” म्हणून वर्गीकृत केले आहे आणि असे म्हटले आहे की “यामुळे दीर्घकाळ किंवा वारंवार संसर्गातून अवयवांचे नुकसान होऊ शकते.